• headoffice@jusbbank.com

मा. श्री. गणपतराव आप्पासाहेब पाटील -

आमचे बॅंकेचे मार्गदर्शक व प्रेरणा देणारे मा. श्री. गणपतराव आप्पासाहेब पाटील (दादा) यांचा परिचय देताना शिरोळ तालूक्यातील अधुनिक व अपारंपारिक शेतीचे महत्व लक्षात घेतले पाहजे.

मा. श्री. गणपतराव आप्पासाहेब पाटील यांचा जन्म दि. १८/०८/१९४७ रोजी जयसिंगपूर येथे झाला. त्यांचा घरचा पारंपारिक व्यवसाय शेती आहे. महाविद्द्यालयीन शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी साहेबांचे वडिल आदरनिय सा. रे. पाटीलसाहेब यांनी शिक्षण सोडून शेती करण्य़ाचा सल्ला दिला. हा सल्ला त्यांना क्षणभर व्यावहारिक वाटला नाही. कारण तो काळ स्वतःला शेतकरी म्हणून घेणे कमीपणाचे वाटणारा होता. त्यावेळी त्यांच्या मनातील चलबिचल सा. रे. पाटील साहेबांनी हेरली आणि शेतीमध्ये आपले भविष्य किती उज्वल घडविता येते हे त्यांनी त्यावेळी त्यांना पटवून दिले.

सा. रे. पाटील त्याच्या मार्गदर्शनानंतर शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन केवळ पिकेच घेतले नाही तर उच्यांकि उत्पादन घेतले यातूनच जानेवारी १९९८ साली श्रीवर्धन बायोटेक ची स्थापना झाली व मार्च १९९८ पासून ग्रीन हाऊस प्रकल्पाची सुरवात केली. आज १०१ एकर मध्ये ग्रीन हाऊस प्रकल्प सुरु आहे.

नव्या पिढीची कार्यशाळा

श्रीवर्धन बायोटेक म्हणजे येणार्‍या नव्या पिढीला कर्तृत्वाची संधी मिळवण्याचा संदेश देणारी कार्यशाळा ठरली आहे. शेती हे क्षेत्र त्रासदायक, तोट्याचे क्षेत्र म्हणून जी प्रतीमा निर्माण झाली आहे ती येथे आल्यानंतर पुसून जाते.

फोंड्या माळावर फुललेली आणि बहरलेली फुलशेती पाहण्यासाठी शालेय स्तरापासून विविध स्तरातील देशातील व परदेशातील युवा पिढी, शेतकरी, सन्मानीय व्यक्ती भेटी देतात.

अभ्यास दौरे

श्री. गणपतराव पाटील साहेब यांनी शेती व शेती पुरक व्यवसायसाठी कॅलिफोर्निया, इस्त्राइल, दुबई, हॉलंड या परदेशी प्रगतशील शेतीचे अभ्यास दौरे केले आहेत. या दौर्‍यातून आत्मसात केलेले प्रगतशिल शेती तंत्रज्ञान याचा उपयोग योग्य रितीने शेती व शेती व्यवस्थापनासाठी केले आहे.


संस्थेचे प्रतिनिधीत्व

मा. तंज्ञ संचालक डॉ. आप्पासाहेब यूआरएफ सा.रे पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बॅंक लि. जयसिंगपूर
चेअरमन श्री दत्त शेतकरी सह. साखर कारखाना लि. शिरोळ
चेअरमन जांभळी शिक्षण प्रसारक मंडळ, जांभळी
संस्थापक चेअरमन श्री दत्त शेतीमाल प्रक्रिया संस्था, जांभळी
माजी चेअरमन विरशैव को-ऑप. बॅंक लि. कोल्हापूर
संचालक शिरोळ तालूका खरेदी विक्रि संघ लि. जयसिंगपूर
आजीव अध्यक्ष जांभळी क्रिडा मंडळ, जांभळी.
पुरस्कार

शेतिनिष्ठ शेतकरी १९८१ महाराष्ट्र शासन
फाय फौंडेशन १९९२ फाय फौंडेशन इंचलकरंजी
कृषी सम्राट १९९४ झुआरी इंडस्ट्रीज लि. गोवा.
उद्यान पंडित २००३ महाराष्ट्र शासन
राष्ट्रीय पुरस्कार २००७ मिडिया टुडे, नवी दिल्ली, यांचेकडुन भारतातील सर्वाधिक फुल उत्पादक व फुल निर्यात पुरस्कार
वसंतराव नाईक कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार २०११ वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मुबंई
मास्टर दिनानाथ पुरस्कार २०१३ दिनानाथ स्मृती प्रतिष्ठान मुंबई