स्व. डॉ. श्री. सा. रे. पाटील - संस्थापक अध्यक्ष (११/१२/१९२१ - ०१/०४/२०१५)
महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालूका पंचक्रोशी मधील जांभळी या छोट्याशा गावामधील शेतकरी कुंटुबांत सा. रे. पाटील यांचा जन्म दिनांक ११/१२/१९२१ रोजी झाला. शालेय जीवन जांभळी व नांदणी खेडेगावातच प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर माध्यमीक शिक्षण जयसिंगपूर या ठिकाणी पुर्ण केले. वडिलांचा शेती व्यवसाय होता ते शेती व्यवसायाशी एकनिष्ट होते. वडिलासमवेत शेती करत त्याच काळी राष्ट्र सेवा दल यांचे विचाराशी त्यांची जवळिक निर्माण झाली.
सेवादलाची सामाजिक विषयावरची शिबीरे त्यावेळी गावागावात होत होती. श्याम पटवर्धन, प्रभीभाई संघवी, बाबुराव मुळीक व चंद्रकांत पाठगावकर हे शिबीरामध्ये असत. त्यावेळी एस. एम. जोशी हे सेवादलाचे अध्यक्ष होते व शामराव पटवर्धन राष्ट्र सेवा दलाचे धडाडीचे नेते होते. माधवराव बागल, आर्चय शंकरराव देव आधि मंडळाचे राष्ट्र निष्ठा आणि सामाजिक कार्याचे वेड लावणारी भाषणे या मंडळाची होत असत. सर्व मंडळीच्या सहवासात पुणे, मुबंई इतर प्रवास होत असत. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त होणेचे असेल तर आपणास एकत्र जमावे लागेल या मंत्राची बीजे त्याच्या जीवणात अल्पवधीतच सुरु झाली.
त्यांचे जांभळी या गावातूनच गावच्या सहकारी सोसायटीच्या कामापासून सार्वजनीक कार्याला सुरवात झाली सार्वजनीक कार्याला अधिक वेळ देता यावा या करिता ते जयसिंगपूर येथे राहायला आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळी जयसिंगपूर मध्ये सुपर वायझिंग नावाची एक संस्था कार्यरत होती त्या संस्थेच्या निवडणूकीत सहभागी झाले. एकूण चार विभागात ती निवडणून होणार होती. त्यांचा पिंड राजकिय नसला तरी त्यांना राजकिय गंध होता. विधायक कामात त्यांना सुरवातीपासून अधिक रस होता.
शेतमालाची दलाली थांबली पाहिजे या हेतूने त्यांनी शिरोल तालूका खरेदी विक्रि संघाची स्थापणा केली त्यामूळे तालुकाभर त्यांचा जन संपर्क वाढत गेला.
इरिगेशन माध्यामातून शेतकर्यासाठी काम करणेचा त्यांनी ध्यास घेतला. व त्याच पाठपुरावा करुन त्यास मंजूरी आणली. यावरुन त्यांची कामात किती तळमळ आहे कामाचा किती ध्यास आहे, आपुलकी आहे हे लक्षात आले त्यानुसार त्यांची राजकीय वर्तुळे निर्माण व्हायला लागली हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवले.
त्यांना वाचनाचा छंद असलेने वि.दा. शिरवाडकर, खांडेकर, साने गुरुजी यांचे साहित्य वाचत असत. ते सेवादलात काम करत असताना त्यांनी ३१ देशाना भेटी दिल्या. आधुनिक शेतीतंत्रज्ञानाची माहिती संकलन केली. त्यांनतर त्यांनी शिरोळ तालूक्यातील नद्द्याच्या उपलब्ध पाणी विचारात घेवून सहकारी तत्वावर २० पाणीपुरवठा करणार्या संस्थाची स्थापना करुन चाळीस हजार एकर शेती जमिन पाण्याखाली आणली. शेतीमधून ऊस उत्पादन होण्याची व्यवस्था करूनच त्यांनी सहकारी साखर कारखाना उभारण्याचे ध्येय ठरविले. त्यानुसार त्यांनुसार त्यांनी दत्ताजीराव कदम यांच्या समवेत त्यावेळचे कॉग्रेसचे नेते बाळासाहेब देसाई, दिनकरराव यादव, विश्वासराव घोरपडे (सरकार) कृषीमंत्री आण्णासाहेब शिंदे, वंसतदादा पाटील यांचे सहकार्याने श्री. दत्त शेतकरी साखर कारखान्याची स्थापना केली. याशिवाय ग्रामिन भागातील सर्वसामान्य लोकांच्यासाठी विविध सहकारी संस्थाची स्थापना केली.
शेतीपुरक व्यवसाय, व्यापार, उद्धोग या माध्यमातून समाज घडवावा ही कल्पना त्यांनी समोर ठेवून मा. सातगोंडा रेवगोंडा पाटील ( सा. रे. पाटील साहेब ) यांनी श्री. दत्तात्रय कुलकर्णी, जयकुमार पंडीत व बाबुराव कोरे व इतर सहकारी यांचे सहकार्याने आर्थिक दुर्बल, गरिब शेतकरी व सर्वसामान्य लोकांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी या बॅंकेची दि. २२/०६/१९६० ई. रोजी स्थापना केली. मा. सातगोंडा रेवगोंडा पाटील ( सा. रे. पाटील साहेब ) यांनी महाराष्ट्राचे आमदारपद १९५७ ते १९६२, १९९९ ते २००४ व २००९ ते २०१४ असे तीन वेळा भूषविले आहे.
त्यांच्या जिवनात अनेक चढ उतार येत गेले अनेक संस्थानी - संघटनांनी येथोचीत सन्मानदेखील केले आजवार एकूण २२ पुरस्कार मिळाले. पहिला पुरस्कार नरुभाई लिमये यांच्या नावाने पुण्य़ात मा. श्री. अजित पवारांच्या हस्ते मिळाला तसेच त्यांना टिळक विध्यापिठाकडून डि लिट पदवी मिळाली.
अशा रितीचे वयाच्या ९४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दि. ०१/०४/२०१५ रोजी त्यांची प्राण ज्योत मावळली. त्यांचे इच्छेनुसार मृत्यूनंतर देहदान केले.