जयसिंगपुर उदगांव सहकारी बॅक - इतिहास स्थापना- २२/०६/१९६०
Reserve Bank Licence No. UBD/MH/956p
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी वसवीलेल्या ऐत्याहासिक व्यापारी पेठ जयसिंगपुर नगरीत व पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराचे माहेरघर असलेल्या कोल्हापूर जिल्हातील आदरनीय आमदार डॉ. श्री आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटीलसाहेब हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना ग्रामीण अर्थव्यवस्था व त्यामधील अडचनीची सखोल माहिती होती.
ग्रामीण भागतील लोकांची सावकारी पाशातून मुक्तता होऊन शेती, शेतीपूरक व्यवसाय, व्यापार , उध्योग या माध्यमातून समाज घडावा हि कल्पना त्यांनी समोर ठेवली होती. मा. सा. रे. पाटील साहेब यांचेवर राष्ट्रसेवादल मधील कार्य तसेच साने गुरुजी, ना. ग. गोरे अशा व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव होता. या कल्पनेतूनच मा. सातगोंडा रेवगोंडा पाटील ( सा. रे. पाटील साहेब ) यांनी श्री. दत्तात्रय कुलकर्णी, जयकुमार पंडित व बाबूराव कोरे इतर सहकारी यांचे सहकार्याने आर्थिक दुर्बल, गरीब शेतकरी व
सर्वसामान्य लोकांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी या बँकची दि. २२/०६/१९६० ई. रोजी स्थापन केली. बँकेची स्थापना करतेवेळी २१ सभासद व भगभंडवलदार रुपये १४२००/ वर बँक चालू झाली.
आज सद्द्य स्थितीत सभसदांचा व ग्राहकांचा पुर्ण विश्वास निर्माण करूण बँक एका भक्कम पायावर ऊभी राहिलेली आहे. बँकेला अनेक चढ उतार आले पण मा . आमदार आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली व त्यांच्या दूरदृष्टीने सर्व अडचणीला तोंड देत अडचनी दूर केल्या आहेत. यात मा. श्री. गणपतराव पाटीलसो यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.
आज या बँकेच्या १० शाखा असून बँकेचे ११,०४८ सभासद व रुपये ५.८४ कोटी भागभांडवल आहे. रुपये १४४ कोटी ठेवी आहेत. ९० कोटीचे कर्ज वाटप केले आहे असा प्रगतीचा चढता आलेख राहिला आहे. बँकेने संगनक प्रणालीचा वापर सन १९९७ पासून केला असून २००९ मध्ये कोअर बँकिंग प्रणालीने बँकेचे व्यवहार चालू आसुन त्यद्रारे शाखा अंतर्गत व्यवहार, एनफटी / आरटीजीएस ई. सोयी दिल्या जातात. बँकेचे स्वतःचे डेटा सेंटर आहे. बॅकेचे दोन ए.टी.एम. असून त्याचा लाभ ग्राहकांना २४ तास आर्थिक व्यवहार करता येतात.
मा. चेअरमन श्री. महादेव राजमाने, मा. व्हाय.चेअरमन श्री. महेंद्र बागी व मा. श्री. सुभास चौगुले यांच्या कुशल नेतृताने बॅक प्रगतीचे उद्दीष्टे साध्या करत आहे.
सन २०२० पर्यंत बँकेचे ५०० कोटी ठेवीचे उद्दिष्ट व शाखा विस्तार करणेचे ठरविले आसूण शाखा विस्तार करण्याचे ठरविले आहे. मोबाईल बॅकिंग, ई.बॅकिंग, रुपे डेविट कार्ड आदि चे सेवा येत्या काळात सुरु करत अहोत.